देश

दररोज फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करून मिळवा ३६ हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अनेक पेन्शन योजना वृद्धापकाळात दर महिन्याला एक निश्चित पेन्शनची हमी देतात. तुम्ही दररोज फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करून 3000 रुपये मासिक पेन्शन मिळवू शकता. म्हणजेच वर्षाला तुम्हाला ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल. या योजनेचे नाव आहे ‘प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना’. सरकारची ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे.

तुमचे मासिक उत्पन्न जर 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुमचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेत सामील होऊन वृद्धापकाळात दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. केंद्र सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू केली आहे. सरकारचे उद्दिष्ट आहे की पुढील 5 वर्षात असंघटित क्षेत्रातील किमान 10 कोटी श्रमिक आणि कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा.

ही शासनाची हमी पेन्शन योजना आहे. यात सामील झाल्यावर, तुम्हाला 60 वर्षांच्या वयानंतर दरमहा 3000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत जितकी रक्कम तुम्ही दरमहा जमा कराल, तितकीच रक्कम सरकारदेखील दर महिन्याला तुमच्या पेन्शन खात्यात जमा करेल.

या योजनेत सामील होण्यासाठी मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर मासिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) किंवा राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC) चे सदस्य किंवा आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

या योजनेत कोण सहभागी होऊ शकतो?
असा कोणताही भारतीय नागरिक प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सामील होऊ शकतो, ज्याचे वय 18 ते 40 वर्षे आहे. ही योजना विशेषकरून मोलकरीण, मोची, शिंपी, रिक्षा चालक, वॉशरमेन आणि मजुरांसाठी सुरू करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात सुमारे 42 कोटी लोक असंघटित क्षेत्रात काम करतात.

जर गुंतवणूकदाराचे वय 18 वर्षे असेल, तर त्याला या योजनेत दरमहा 55 रुपये, 29 वर्षांसाठी दरमहा 100 रुपये आणि 40 वर्षांपर्यंत दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. जर लाभार्थी पेन्शन मिळण्यापूर्वीच मरण पावला तर पेन्शनच्या 50 टक्के रक्कम त्याच्या जोडीदाराला दिली जाईल.

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी प्रामुख्याने तीन कागदपत्रांची आवश्यकता असेल. आधार कार्ड, बचत किंवा जन धन खाते असलेले IFSC आणि वैध मोबाईल नंबर आवश्यक आहे. असंघटित कामगार क्षेत्रात विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि व्यवसायांमुळे, त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना ओळखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वेबसाईटवर जवळचे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) शोधावे लागेल. याशिवाय, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), राज्य कर्मचारी विमा महामंडळ (ESIC), EPFO ​​किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार कार्यालयाच्या शाखांना भेट देऊनही अर्ज करता येतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…

3 दिवस ago

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…

6 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…

6 दिवस ago

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…

1 आठवडा ago

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…

1 आठवडा ago

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

1 आठवडा ago