क्राईम

नागपूर हादरले! अल्पवयीन मुलीवर चार तासांत दोन वेळा सामूहिक बलात्कार

नागपूर : नागपुरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर चार तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सामूहिक बलात्कार झाला आहे. सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर ही मुलगी घर सोडून गेली होती. त्यानंतर ही भयंकर घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी सोडून गेली. त्यानंतर तिनं सिव्हिल लाईन्सला जाण्यासाठी रिक्षा पकडली. पण तिच्याकडे पैसे नसल्याचे कळताच चालकाने तिला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितले. त्याच दरम्यान मोहम्मद तौसीफ (26) आणि मोहम्मद शाहनवाज उर्फ सना (25) या दोन रिक्षाचालकांनी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेले. त्या ठिकाणी चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर आरोपी तौसिफ आणि सना यांनी मुलीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाजवळ रिक्षाचालक मोहम्मद मुशीर (23) आणि आणखी एका व्यक्तीच्या स्वाधीन केले. मोहम्मद मुशीर आणि अन्य व्यक्तीने या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार केला. त्यानंतर दोघे आरोपी तेथून पसार झाले.

काही वेळाने दोन रिक्षाचालकांनी पीडित मुलीला पाहिले. त्यांनी तिची विचारपूस केली. तेव्हा पीडित मुलीने त्यांना आपल्याला नाशिकला जायचं असल्याचं सांगितलं. त्या दोघांनी तिला नाशिकला जाण्याचे रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी मदत केली आणि तिला काही रोख रक्कम देखील दिली.

रेल्वे पोलिसांच्या पथकाला ही पीडित मुलगी नागपूर रेल्वे स्थानकावर दिसली. पोलिसांना संशय आल्याने जीआरपी कर्मचारी मुलीजवळ गेले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला एका NGO च्या ताब्यात दिले. त्यानंतर तिने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि सना, तौसीफ, मुशीर आणि मोहम्मद नौशाद यांना ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

7 दिवस ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

7 दिवस ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago