pm modi video of saying we should focus on increasing corona positive cases goes viral
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल (१८ मे) कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणच्या ४६ जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकून ‘पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवा’ असं म्हटलं होतं. त्यांचा हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगानं वाढवणं, वेगानं चाचण्यांची संख्या वाढवणं या सर्व गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल’ असं म्हणताना पंतप्रधान या व्हिडिओत दिसत आहेत. काँग्रेस समर्थकांनी हा मुद्दा उचलून धरत पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. ‘पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांनी केवळ वक्तव्य केलेलं नाही तर पश्चिम बंगालच्या निवडणूक सभांमधून त्यांनी याचं उदाहरणही दिलं आहे’ अशी टीका काँग्रेसने मोदींवर केली आहे.
काल राज्य आणि जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी ग्रामीण क्षेत्रातील संक्रमण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर जोर देत अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. अधिकाऱ्यांना ‘फिल्ड कमांडर’ म्हणून संबोधताना ‘तुम्ही सर्वच या लढाईचं नेतृत्व करत आहात’ असंही ते म्हणाले. आपापल्या राज्यांत आणि जिल्ह्यांत कोविडवर नियंत्रण मिळवला तर देश आपोआपच कोरोनावर नियंत्रण मिळवू शकेल, तुम्हाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार, जे गरजेचं ते करा, असं मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितलं.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…