देश

थरकाप उडवणारी घटना, वडिलांनी मुलीचे शिर धडावेगळे केले आणि ते हातात घेऊन गाठले पोलिस स्टेशन

उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात अतिशय भयंकर घटना घडली आहे. एका व्यक्तीने धारदार शस्त्राने आपल्या 18 वर्षाच्या मुलीचे शिर धडावेगळे केले आणि नंतर स्वत: च मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन पोलिस स्टेशन गाठले. हे भयानक दृश्य बघून सर्वांचा थरकाप उडाला. या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की मी मुलीला कापून टाकले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हरदोईच्या मंजिला पोलिस स्टेशन परिसरातील पंडेतरा गावचा आहे. सर्वेश असे त्याचे नाव आहे. सर्वेशने 2 दिवसांपूर्वी आपल्या मुलीला गावातील आदर्श नावाच्या मुलाबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. त्यावेळी मुलगी घटनास्थळावरून फरार झाली होती. परंतु, या घटनेमुळे मुलीचे वडील खूप संतापले होते. तेव्हाच त्यांनी आपली मुलगी आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली. गुरुवारी त्याची पत्नी शेतीत गेली असता, मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी सर्वेशने मुलीवर धारदार शस्त्राने अनेक वार करून तिचे डोके धडावेगळे केले.

यानंतर आरोपी वडिलांनी मुलीचे डोके हातात घेतले आणि पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. वाटेत अनेक लोकांनी हे भयानक दृश्य पाहिले, परंतु कोणाचीही आरोपीजवळ जाण्याची हिम्मत झाली नाही. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, पोलिस येईपर्यंत आरोपी स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. सर्वेशने पोलिसांना सांगितले, “सर, मी माझ्या मुलीला कापून टाकलं.” ते ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर पोलिस दल आरोपीला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तिथे मुलीचे धड रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago