देश

ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडीयम येथे आयोजित करण्यात आले. या सभेस उपमुख्यमंत्री फडणवीस संबोधित करीत होते. या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार बाळू धानोरकर, आमदार डॉ. परिणय फुके, नाना पटोले, राज्यातील ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे तसेच देशभरातील ओबीसी महासंघातील सदस्य, ओबीसी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसी समाजाकरिता स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात आले. त्यावेळी ओबीसी समाजासाठीच्या 21 मागण्या पूर्ण करण्यात आल्या. शिक्षण, वसतीगृह, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती, भारतीय प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परिक्षार्थीचे प्रशिक्षण वर्ग आदि विषयांबाबतही निर्णय घेऊन ओबीसी समाजातील सर्वच घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी काही मागण्या आल्यास त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम केंद्र शासनाने केले असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago