देश

महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल पाटील सीमेवर शहीद; सकाळी आईशी बोलला होता…

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आणखी एक सुपुत्र सीमेवर शहीद झाला आहे. ३० वर्षीय जवान राहुल लहू पाटील यांना पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना आज दुपारी एक वाजता वीरमरण आले आहे. एरंडोल येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कर होणार असून मागील दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान सीमेवर शहीद झाले आहेत.

पंजाबमधील फजलखां तेथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर राहुल पाटील हे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव पंजाबहून मुंबई व मुंबईहून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी आणले जाणार आहे. राहुल पाटील यांना वीरमरण आल्याची वार्ता समजताच संपूर्ण तालुक्यातच शोककळा पसरली.

राहुल पाटील यांनी आज सकाळी साडेसात वाजता त्यांच्या आई व भावाला व्हिडिओ कॉल केला होता. यावेळी त्यांनी पुढच्या महिन्यात परिवारासह घरी येणार असल्याचे सांगितले होते. तसेच पाटील यांनी व्हिडिओ कॉलवर भाऊ व आईला कर्तव्य बजावत असलेले स्थळही दाखविले. एरंडोल येथील शंकरनगर गांधीपुरा परिसरात राहुल यांचे घर असून राहुल हे २००९ मध्ये लातूर येथे लष्करात भरती झाले होते. ते सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सेवेत होते. पत्नी व त्यांच्या दोन मुलींसह ते पंजाबमध्येच राहत होते. आज (५ फेब्रुवारी 2021) दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल त्यांच्या भावाला फोन वरून राहुल हे शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago