Big news: Covishield corona vaccine is likely to be approved in India today
भारतात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. आज ‘कोविशील्ड‘ या लशीला भारतात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची (SEC) आज (बुधवार) कोरोना लसीवर बैठक होणार असून त्यामध्ये भारतामध्ये कोरोना लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीला मान्यता मिळाली आहे. तिच्याशी संबंधित कोविशील्ड लशीला भारतात वापरास मान्यता देण्याची प्रतिक्षा आहे, त्यावर आज बैठक होणार आहे. भारतात ही बैठक महत्त्वपूर्ण आहे, कारण बुधवारी ब्रिटनने ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीच्या वापरास मान्यता दिली आहे. काही दिवसांत ब्रिटनमधील लोकांना ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोना लशीचा डोस मिळण्यास प्रारंभ होईल.
सिरम इन्स्टिट्यूट भारतात ऑक्सफोर्ड- अॅस्ट्राजेनेकाची कोरोना लस बनवित आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, भारतात कोविशील्डचे सुरुवातीचे 4-5 कोटी डोस साठवले गेले आहेत.
भारत सरकारच्या वतीने लस देण्याची तयारी आधीच सुरू आहे. सुरुवातीला प्रामुख्याने ही लस 30 कोटी लोकांपर्यंत पोहचविण्यावर भर आहे, ज्यामध्ये कोरोना वॉरियर्सला प्राधान्य दिले जाईल. आरोग्य कर्मचारी, पोलिस, कोरोना वॉरियर्स, 50 वर्षांच्या पुढील लोक आणि आजारी लोक यांना प्राधान्य दिले जाईल.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…