महाराष्ट्र

निर्यातदारांसाठी 28 व 29 सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन

मुंबई : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-400012 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशाचा सहभाग हा आर्थिक कामगिरीचा महत्वाचा मापदंड आहे. त्यानुषंगाने गुंतवणूकवृद्धी (Investment Promotion) व्यवसाय सुलभीकरण (Ease of Doing Business), निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन (One District one Product) या प्रमुख मुद्यांचा अंतर्भाव असलेली ही कार्यशाळा आणि प्रदर्शन असणार आहे.

कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत निर्यातीकरिता नियम, बँकेचा सहभाग, उद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना व माहिती, निर्यातीकरिता राज्य व केंद्र शासनाच्या विविध तरतूदी, तज्ज्ञ निर्यातदारांचे अनुभव कथन तसेच सदर चर्चासत्रांकरिता निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक सवलती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इत्यादी उपस्थित राहणार आहेत.

या एक दिवसीय कार्यशाळा तसेच दोन दिवसीय प्रदर्शनाकरिता 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत उपस्थित रहावे, असे जिल्ह्यातील निर्यातदारांना आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेकरिता मर्यादित आसन व्यवस्था असल्याने आपल्या उपस्थितीबाबत उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, चेंबूर, मुंबई, या कार्यालयाच्या ई-मेल आयडी didicmumbai@gmail.com तसेच या कार्यालयाच्या 022-25206199/25208182 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करावी, असे उद्योग सह संचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, मुंबई यांनी कळविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago