महाराष्ट्र

झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन मजुराचा मृत्यू; ठेकेदार व सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : बाणेर येथील ऋतुरंग पार्क सोसायटीच्या आवारात झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना २७ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात ठेकेदार व सोसायटी पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. इंगवले चौक, पिंपळे निलख) असे आहे. याबाबत मृत व्यक्तीचा मुलगा अमोल लहू क्षीरसागर (वय ३४, रा. पिंपळे निलख) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, झाडांच्या फांद्या तोडण्याच्या कामासाठी आवश्यक ती सुरक्षा साधने – जसे की सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सेफ्टी नेट किंवा इतर संरक्षक साधने मजुराला पुरवण्यात आली नव्हती. यामुळेच ही दुर्घटना घडली, असा ठपका फिर्यादी अमोल क्षीरसागर यांनी ठेवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुरंग पार्क या सोसायटीच्या आवारातील झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यामुळे त्या छाटण्याचे काम ठेकेदार रमेश वामन लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर २७ जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास लहू क्षीरसागर झाडावर चढून फांद्या कापण्याचे काम करत होते, यावेळी ते तोल जाऊन खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात ठेकेदार रमेश लोंढे, सोसायटीचे चेअरमन श्रीकृष्ण सराफ आणि सेक्रेटरी श्रीकृष्ण बिडवे यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०४(अ) (दुर्बळ निष्काळजीपणामुळे मृत्यू), ३३७ व ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक थिटे करत आहेत.

झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी पुणे महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. या प्रकरणात सदर कामासाठी आवश्यक ती अधिकृत परवानगी सोसायटी किंवा ठेकेदाराने घेतली होती का? याबाबत विचारणा करण्यात आली असता, “सदर बाब तपासात आहे. त्याची चौकशी केली जात आहे आणि शहानिशा करण्यात येईल,” अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago