महाराष्ट्र

अंगणवाड्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार – आदिती तटकरे

मुंबई : राज्यातील ज्या अंगणवाड्यांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृहे आदी मूलभूत सुविधांपैकी काही सुविधा उपलब्ध नसतील तर त्या संबंधित विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सतीश चव्हाण यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्रीमती तटकरे म्हणाल्या की, ज्या अंगणवाड्यांना इमारती नसतील, त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या अंगणवाड्या भाड्याच्या जागेत आहेत, त्यांच्यासाठी निधी वाढवून दिला जाईल. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ३५०१ अंगणवाड्या असून २७०६ अंगणवाड्यांना स्वतःची जागा आहे. इतर अंगणवाड्यांपैकी ११६ अंगणवाड्या शाळेच्या खोलीत, ३३६ अंगणवाड्या समाजमंदिरात व ३०४ अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरतात. अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच १३ व्या वित्त आयोगाकडून अंगणवाडी बांधकामाकरिता प्राप्त झालेल्या निधीपैकी अखर्चित निधीच्या प्रमाणात अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. काही अंगणवाड्या उघड्यावर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago