महाराष्ट्र

डिसले गुरुजींसारख्या शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचवणार – मुख्यमंत्री

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला. शिक्षण क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. डिसले गुरुजींप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.

विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी आणि ज्ञानवर्धक शिक्षण कसे देता येईल यासाठी शालेय शिक्षण विभागाने डिसले गुरुजींच्या ज्ञानाचा वापर करावा असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. डिसले सरांनी शैक्षणिक क्षैत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर साऱ्या जगभर पोहचविणाऱ्या रणजितसिंह डिसले सरांच्या कार्याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काढले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago