will follow up with the Central Government for the grand memorial temple of Sant Chokha Mela - MP Dr. Sunil Baliram Gaikwad
मंगळवेढा : ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ या वारीचा शुभारंभ लातूरचे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद यांच्या हस्ते करण्यात आला. श्री संत चोखामेळा समाधी मंदिर, मंगळवेढ़ा यांच्या समाधीची पूजा करुण समतेची वारीचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ सुनील बळीराम गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की मंगळवेढा ही संतांची भूमी आहे, इथे अनेक संत होऊन गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात श्री संत चोखामेळा यांचे एकमेव घराणे असे आहे, ज्या घरातील पाच संत आहेत. श्री संत चोखोबा हे १३ व्या शतकातील एक महान संत आहेत. त्या काळात ते अस्पृश्य समाजातील महार जातीचे असल्याने त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात कधीच जाता आले नाही. पण अनेक अभंग लिहून त्यांनी सामाजिक समतेसाठी काम केले. अशा महान संताची ही भूमी आहे. इथे श्री संत चोखामेळा यांचे भव्य असे स्मारक मंदिर झालेच पाहिजे, यासाठी आपण स्वतः भारत सरकार कडे पाठपुरावा करून सी एस आर फंड मिळवण्याचा प्रयत्न करू आणि भव्य असे स्मारक मंदिर उभे करू, असे ते यावेळी म्हणाले.
या कामी स्थानिक आमदार समाधान औताडे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी लक्ष घालावे असे ही गायकवाड यांनी आवर्जून सांगितले. विशेष म्हणजे सचिन पाटील यांनी ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ असे नियोजन करून आज पासून चोखोबांच्या समाधी पासून सुरुवात करुन तुकोबारायांच्या समाधी वर समारोप करणार आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल जाहीर आभार व्यक्त करून श्री संत चोखामेळांच्या अभ्यासन केंद्रावर काम करण्याची इच्छा ही प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी जगतगुरु संतशीरोमनी तुकोबाराय यांचे वंशज ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज( श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर सदस्य), सोलापुर चे माज़ी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, स्थानिक लोकप्रिय आमदार समाधान औताडे, प्रकाश महाराज, निशिकांत मरचंडराव, शशिकांत चव्हाण, नागसेन पुंडगे, दामोदर माने, समता वारी चे संयोजक सचिन पाटिल, मार्गदर्शक निलेश गद्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…