महाराष्ट्र

राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठयासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट

नवी दिल्ली : राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याच्यादृष्टीने माहिती जाणून घेण्यासाठी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेला भेट दिली.

वाघमारे यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रीड कार्यवाह संस्थेच्या(पॉवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन-पोसोको) कार्यालयाला नुकतीच भेट देवून या संस्थेद्वारे देशातील वीज क्षेत्रावर (निर्मिती,पारेषण आणि वितरणावर) होणारी देखरेख व त्याद्वारे देशभर होणाऱ्या अखंडित व गुणात्मक वीज पुरवठयाबाबतही माहिती जाणून घेतली. पोसोकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.आर. नरसिम्हन, राष्ट्रीय लोड डिस्पॅच सेंटरचे (एनएलडीसी) महाव्यवस्थापक विवेक पांडे, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाच्या पारेषण कंपनीचे सल्लागार प्रसाद , होल्डींग कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यावेळी उपस्थित होते.

देशभर पसरलेल्या वीजेच्या जाळयावर पोसोको देखरेख व निरीक्षण करते. भौगोलिकदृष्टया देशाच्या दक्षिण व उत्तरेतील राज्यांना जोडणाऱ्या महाराष्ट्र राज्याची या संस्थेच्याकार्याच्यादृष्टीने महत्वाची भूमिका आहे. ऊर्जा निर्मिती, पारेषण आणि वितरण करताना उच्चदाब वाहिन्यांवर अनेकदा दाब वाढतो. तो समतोल राहावा यादृष्टीने प्रयत्न आवश्यक असतात यासंबंधात महाराष्ट्राची वर्तमानस्थिती वाघमारे यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच, याबाबत आवश्यक असणाऱ्या तातडीच्या सुधारणांबाबत त्यांनी माहिती घेतली. येत्याकाळात राज्यात अखंडित व गुणात्मक वीज पुरवठा करण्याच्यादृष्टीने करावयाच्या पायाभूत सुधारणांबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. राष्ट्रीय ऊर्जा ग्रीडचे एकात्मिक कार्य सुरक्षित पध्दतीने सुनिश्चित करण्याची महत्वाची जबाबदारी पोसोको संस्थेची आहे. यात पाच प्रादेशिक लोड डिस्पॅच सेंटर आणि राष्ट्रीय लोड डिस्पॅच सेंटर एनएलडीसी यांचाही समावेश आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

8 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago