Veteran leader Vinayakdada Patil passes away, only Indian to receive Outstanding Tree Farmer of India and Rolex Award
नाशिक : ज्येष्ठ माजी मंत्री, लेखक, साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मुंबईत काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर करोनावर उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते नुकतेच नाशिकला घरी परतले होते. अचानक प्रकृती ढासळून त्यांची प्राणज्योत मालवली.
वनशेती हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. ज्या वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जेट्रोफांची लागवड आता सरकारमार्फत सर्वत्र करण्यात येत आहे. तसेच जगातील अनेक देशांत ही लागवड केली जात आहे.
विनायकदादा पाटील यांना मिळालेले पुरस्कार :
यशोधन, निलगिरीची शेती, एक्केचाळीस वृक्ष, ऑइल ग्लूम टू ऑइल ब्लूम, जेट्रोफा २००३ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.
विनायकदादा पाटील यांनी कुंदेवाडीचे सरपंच म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर निफाड पंचायत समिती सभापती, आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…