Various initiatives by the government regarding the growth of tourism
मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक राज्यात मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांच्याशी चर्चा केली. मंत्रालयातील दालनात रशियाचे महावाणिज्य दूत व त्यांचे शिष्टमंडळ यांनी मंत्री लोढा यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
उपकौन्सुल जनरल ओलेगा डीरेरा, ओलेगा मेलनीको, मॉस्को पर्यटन समितीचे उपाध्यक्ष अलीना अरतुयुन्वा, मॉस्को आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे बुलेट निरकोवान,तसेच मॉस्को आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे प्रमुख अना फोनाकोव्हा यावेळी उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन वाढीस चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. पर्यटन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प राबवून पर्यटन क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. रशियाचे कौन्सुल जनरल अलेक्सा सुरोस्तव यांनी यावेळी मॉस्को पर्यटन विभागाकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम तसेच पर्यटन सुविधांबाबत सविस्तर सादरीकरण यावेळी केले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…