महाराष्ट्र

नारायण राणे यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण, पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आपली भूमिका

मुंबई : ‘तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाही, तुम्हाला सर्वांना मी पुरून उरलो तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणीही नव्हते. त्यांना आमचा बंदोबस्त करायचा करू द्या, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली असून न्यायालयाने त्यांना सर्व कायदेशीर कारवाईपासून संरक्षण दिलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

नारायण राणे यावेळी म्हणाले की काल रत्नागिरीमधून महाड कोर्टात जाऊन पहाटे 5 वाजता आलो. आज हायकोर्टात माझ्या विरोधात ज्या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या, त्याबाबत याचिका दाखल केली होती. साडेतीन वाजता याबाबत सुनावणी झाली आहे. माझ्या बाजूने हे निकाल लागले आहेत. 17 सप्टेंबर पर्यंत केस असल्यामुळे याबाबत काही बोलणार नाही. आज पत्रकारांना माहिती देण्यासाठी आलो आहे.

ते म्हणाले कि, “मागील काही दिवस माझा दौरा सुरू होता. जे काही माध्यमांमध्ये येत होतं याबाबत मला माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगुलपणाचा फायदा घेत होते. देशातील कॅबिनेटमध्ये मला मंत्री म्हणून घेतलं. आम्हा नवीन सर्व मंत्र्यांना जनआशीर्वाद यात्रा करण्याचं सांगितलं होतं. 19 तारखेपासून मी यात्रा सुरू केली होती. कालपर्यंत सुरू होती. 2 दिवस यात्रा थांबली आहे. परवापासून यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. आमच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांनी आमचा विरोध केला.”

राणे पुढे म्हणाले कि, “पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. मला सार्थ अभिमान आहे, माझ्या देशाचा, मला सहन झाले नाही. ते म्हणाले होते की सेनाभवनाकडे कुणी पाहिले तर पाय तोडा. ते महाशय काय बोलले होते. सेनाभवनाबाबत कोण जर अशी भाषा करत असेल तर त्याचं थोबाड फोडा. यावर गुन्हा दाखल करायला नको. योगीबाबत बोलले होते योगी आहे की ढोंगी, याला चपलाने मारलं पाहिजे. काय केलं होतं त्यांनी? अमित शाह बाबत बोलले होते की, निर्लज्जपणाने हा शब्द वापरतो. माननीय पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं.”

तसंच, अनिल परब यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते पोलिसांवर दबाव टाकत आहे. तो आदेश देतो. माझा सवाल आहे, दिशा सालीयन, कथित संजय राठोड प्रकरणातील मुलगी यांचं पुढं काय झालं? ज्यांनी हे सर्व केलं ते जोपर्यंत आत जात नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मला भारत देशाचा अभिमान आहे ज्याला भारताच्या स्वातंत्र्यदिनाबाबत माहिती नाही. त्यामुळे माझ्या तोंडून हे वाक्य आलं. भाजप नेते, मंत्र्यांविरोधात कुणी काही बोलणार असेल, तर मी सहन करणार नाही. आपण काही बोललो तर वाद होतोय, त्यामुळे आता जपून पावलं टाकावी लागणार आहे, असंही राणे म्हणाले.

मी काय बोललो ते वाक्य मी परत बोलणार नाही. 52 वर्षात अशी पत्रकारिता पाहिली नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? संजय राऊत हे संपादक होण्याच्या लायकीचे नाही, त्यांना 17 तारखेला कोर्टात सुनावणी झाल्यानंतर उत्तर देणार आहे, असंही राणे म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

6 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

6 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

6 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

1 आठवडा ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 आठवडा ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago