Union Home Minister Amit Shah to visit Maharashtra today
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करणार आहेत.
अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे अशी इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातोय. पण गेल्या काही दिवसांपासून भाजपने या भागात नारायण राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आजचा अमित शाह यांचा दौरा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.
अमित शाह यांच्या दौऱ्याने कोकणात भाजपला बळकटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते पण शेतकरी आंदोलकांनी चक्का जाम पुकारल्याने हा दौरा रद्द करण्यात आला होता.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…