महाराष्ट्र

भरदिवसा घरात घुसून महिला डॉक्टरवर चाकूने हल्ला, परभणीतील धक्कादायक प्रकार

परभणी : परभणीत दोन जणांनी भरदिवसा घरात घुसून एका महिला डॉक्टरवर चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील गणेश नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. ज्योती सांगळे असे जखमी झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या जिंतूर शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

जिंतूर शहरातील गणेश नगर येथे डॉ. गणेश सांगळे आणि त्यांची पत्नी डॉ. ज्योती सांगळे त्यांच्या मुलीसह राहतात. आज दुपारी (२५ जुलै) डॉ. ज्योती सांगळे आणि त्यांची मुलगी दोघीच घरात होत्या. यावेळी अचानक दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात शिरल्या आणि त्यांनी लहान मुलीला चाकू दाखवला. त्यानंतर डॉ. ज्योती समोर आल्या असता त्यांनाही चाकू दाखवत धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरून डॉ. ज्योती यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले आणि घरातून पळ काढला. यात डॉ. ज्योती यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, गोंधळ ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ डॉक्टर सांगळे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांना जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी जिंतूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र, हा हल्ला का करण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago