महाराष्ट्र

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट

पुणे : राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली.

यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर सरनाईक म्हणाले, मंत्री महोदय भेट देणार आहेत म्हणून केवळ एका दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका, प्रवाशांना दररोज स्वच्छ टापटीप बसस्थानक, निर्जंतूक प्रसाधनगृहे आणि वाजवी दरामध्ये खाद्यपदार्थ मिळतील असे उपहारगृह असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्थानिक एसटी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले.

यावेळी सरनाईक यांनी बसस्थानकावर प्रतिक्षालयात असलेल्या प्रवाशांशी संवाद साधला असता काही प्रवाशांनी लोणावळा बसस्थानकावर वेळापत्रकानुसार नियोजित बसेस येत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ बसची वाट बघावी लागते, अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, पुणे प्रादेशिक व्यवस्थापकांनी सर्व बसेस वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावर आल्या पाहिजेत, अशी सूचना संबंधित आगार व्यवस्थापक यांना देण्याच्या सूचना सरनाईक यांनी केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago