महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करुन स्थानिकांच्या रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महाबळेश्वर सह तापोळा, बामणोली, कास, वासोटा या सर्व भागात पर्यटनाच्या विकासासाठी सर्व सुविधा उभरल्या जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी पूल बांधण्यात येत असून तेथील नागरिकांचे दळवणवळ अधिक सोयीचे व्हावे यासाठी आणखीन दोन पुलांना मंजुरी देण्यात आली आहे. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. क्लस्टर शेतीमध्ये लोकांना एकत्र आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासने कामही सुरु केले आहे. त्याचबरोबर बांबू लागवड करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कंदाटी खोऱ्यामध्ये वन औषधी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्यावरही काम करण्यात येत असल्याचे, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठीचे निकष बदलण्यात आले आहेत. एनडीआरएफ चे निकषात दुपटीने वाढ केली असून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी मोठ्या प्रमाणावर भरपाई देण्यात येत आहेत. यासाठी पंधराशे कोटी रुपये मदत वाटप केली आहे. पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वाटप केले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर आणखी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यामुळे मायबाप असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळासारख्या संकटात ही शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

51 मिनिटे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago