महाराष्ट्र

राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पूर्व भागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. गेल्या ४ दिवसांपासून रायगडमध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असून, तेथील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. वर्ध्यातील कान्होली गावात 150 हून अधिक लोक पुराच्या पाण्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत असून आतापर्यंत यशोदा आणि वर्धा नदीतून सुमारे 57 जणांची सुटका करण्यात आली आहे.

कुंडलिकासह अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाराष्ट्रातील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड नाका ते नागोठणे, वडखळ या रस्त्यावर खड्डे भरले आहेत. राज्यातील काही नद्या ओसंडून वाहत असल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वर्ध्याच्या नवव्या वर्धा प्रकल्पाच्या 31 दरवाजांमधून पावसाचे पाणी बाहेर काढले जात आहे. काल विदर्भात रेड अलर्ट तर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. मुंबईतील मरीन ड्राईव्हला भरती-ओहोटीचा फटका बसला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago