महाराष्ट्र

रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल- कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

सांगली : पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभागाने आयोजित केलेला रानभाज्या महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली. जिल्हा कृषी कार्यालय व प्रकल्प संचालक (आत्मा) सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विजयनगर मधील आत्मा सभागृह येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, राजभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढवावी. रानभाजी महोत्सव शहरातील महत्त्तवाच्या ठिकाणी आयोजित करण्यात यावेत यामुळे रानभाज्यांना चांगले मार्केट लाभेल. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे चांगले भाव मिळतील याबरोबरच जनतेला माहिती नसणाऱ्या भाज्यांचीही ओळख होईल. जून-जुलै च्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या निसर्गाताच उगवून येत असल्यामुळे त्या सेंद्रीय असतात त्यांची पौष्टीकताही चांगल्या दर्जाची असते. निसर्गाताच निर्माण झालेल्या या राजभाज्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने रानभाज्यांच्या महोत्सवांचे आयोजन करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी रानभाज्यांच्या प्रत्येक स्टॉलवर जावून भाज्यांची माहिती घेतली, तर काही भाज्यांची चवही चाखली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago