mahesh kothe solapur
सोलापूर : शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. मी भाजपमध्ये जाणार अशा अफवा पसरवून माझं शिवसेनेचं तिकीट कट करण्याचं षडयंत्र यापूर्वी रचलं गेलं होतं. त्याच पद्धतीचे षडयंत्र आता पुन्हा माझ्याबाबतीत रचले जात आहे, असा खुलासा कोठेंनी केला.
मी शिवसेनेत नाराज जरूर आहे. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं महेश कोठे यांनी स्पष्ट केले. पुतण्या कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे मी कुटुंबीयांसोबत सध्या होम आयसोलेशन मध्ये आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत केवळ अफवा असल्याचं महेश कोठे यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटलो नसून माझ्या संदर्भातल्या बातम्या आल्या आहेत, त्यामध्ये कसलेच तथ्य नसल्याचं कोठे यांनी सांगितलं आहे. सध्या क्वारंटाईन असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचे कोठे यांनी सांगितले. महेश कोठे हे सध्या शिवसेनेत असून काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे ते चिरंजीव आहेत.
महेश कोठे यांनी 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…