महाराष्ट्र

लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना

मुंबई : महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते सुरक्षा ही लोकांची सुरक्षा आहे, त्यांच्या जिवाची सुरक्षा आहे असे समजून घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची 11वी बैठक संपन्न झाली.

परिवहन मंत्री ॲड. परब म्हणाले, अपघातामुळे निष्पाप लोकांचा जीव जातो आणि त्यांचे कुटुंब संकटात सापडते. घरातला एखादा कर्ता व्यक्ती मृत्यु पावल्यास त्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक अवस्था काय होते ही आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची संकल्पना असली पाहिजे. यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर गठीत केलेल्या समित्यांनी वारंवार आढावा घेऊन राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यासाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे. रस्ते सुरक्षेसाठी कायद्याच्या धाकाबरोबरच प्रबोधनाची सुद्धा गरज आहे. यासाठी प्रमुख महामार्गावर वेगाची मर्यादा दर्शविणारे फलक, गतिरोधक, अपघात ठिकाणाची माहिती, वळण असलेल्या रस्त्याची माहिती असे माहिती फलक असले पाहिजे. अपघातामध्ये होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे.

अपघात झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते. त्यासाठी आरोग्य यंत्रणेनी सहकार्य करावे. ग्रामीण भागामध्ये ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागे रेडियमच्या पट्ट्या दर्शनी भागावर असाव्यात, अशा सूचना करून महाराष्ट्रातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही परब यांनी यावेळी केले.

अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह म्हणाले, गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी अपघाताची संख्या कमी झाली तरी ती समाधानकारक नाही. ही संख्या कमी दिसत असली तरी मृत्यू आणि जखमींची संख्या अधिक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार सर्व उपाययोजना करुन शून्य अपघाताचे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्हा स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शिस्त, नियमांचे पालन, संवेदना, सुरक्षितता आणि कारवाई यातून वाहनचालकांची मानसिकता अनुकुल करुन सकारात्मक मानसिकतेकडे नेले पाहिजे आणि चांगले वाहनचालक तयार होतील याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

यासाठी एक वेबपोर्टल तयार करण्यात यावे. यावर झालेल्या रस्ते अपघातांविषयी माहिती, अपघाताचे प्रकार, ठिकाण, अपघाताची वेळ, नेमके कारण याची माहिती स्थानिक समितीने त्यावर दिली पाहिजे. जिथे अपघात झाला त्याठिकाणी जावून स्थानिक प्रशासनाने संबंधित विभागाला अपघाताचे कारण कळविले पाहिजे, अशा सूचनाही सिंह यांनी यावेळी केल्या. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागाचे आणि सेव्ह लाईफ फांऊडेशन, परिसर या सेवाभावी संस्थेने सादरीकरण केले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago