महाराष्ट्र

शेवटच्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं वाटत होतं, पण.. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. माझा पक्षावर कधीच राग नव्हता, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं. गेल्या काही वर्षांपासून पक्षात होणारा अमपान आणि राजकारण यामुळे अखेरीस आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं. खडसेंच्या राजीनाम्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे.

चंद्रकांत पाटील म्हटले , नाथाभाऊ आणि आमच्यात संवाद सुरु होता. आज सकाळी जयंत पाटलांचं ट्विट त्यांनी रिट्वीट केलं आणि मग डिलीट केलं तोपर्यंत आम्हाला आशा होती की ते सोडून जाणार नाही. त्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं आम्हाला वाटत होतं. देवेंद्र फडणवीसांविरोधात त्यांचे जे काही आरोप असतील त्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि फडणवीसांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलंय. परंतू या मुद्द्यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्या घटनेविषयी प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. खडसे यांना आमच्या पक्षात एक स्थान होतं. त्यांना राजीनामा देण्याची गरज नव्हती. पण आता यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.” पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी खडसेंच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसेंच्या निर्णयावर खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया

भाजपला राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया..

एकनाथ खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा – सुधीर मुनगंटीवार

मोठी बातमी: भाजपला मोठा धक्का एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, राष्ट्रवादीत प्रवेश करणार: जयंत पाटील

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago