महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – दादाजी भुसे

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री भुसे यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे आता कार्यान्वित झाले आहेत. या मार्गावर दररोज किमान १७-१८ हजार वाहने प्रवास करतात. आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. अजून दोन टप्पे बाकी असून त्यातील एक टप्पा सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि शेवटचा टप्पा मे -२०२४ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मंत्री भुसे म्हणाले की, या महामार्गावर जे अपघात झाले त्यामध्ये विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हर टेकिंग करणे, लेन शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहने नसणे, वाहन अवैधरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे तसेच ड्रायव्हिंग करताना चालक सतर्क नसणे, वाहनामध्ये तांत्रिक बिघाड होणे, टायर फुटणे, वाहन चालकाचा डोळा लागणे, वाहनावरचे नियंत्रण सुटणे, व्यसन करून वाहन चालविणे, आग लागणे, मागून दुसऱ्या वाहनाने धक्का मारणे, वाहनाचा तोल जाऊन उलटणे ही अपघात होण्याची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले.

मंत्री भुसे म्हणाले की, हा महामार्ग इंडियन रोड काँग्रेसच्या संबंधित मार्गदर्शक तत्वानुसारच संकल्पित केला असून वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, महामार्ग पोलिसांमार्फत व आर.टी.ओ. मार्फत अपघात होऊ नये यादृष्टीने वाहन चालकांना वेळोवेळी समुपदेशन केले जात आहे. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांवर दंड आकारणी करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, क्रॅटआईज व डेलिनेटर्स लावण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

समृध्दी महामार्गावर वाहनांचे टायर तपासणी करिता पथकर नाक्यांवर आर.टी.ओ विभागास जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या महामार्गावर रहदारी आणि घटना नियंत्रणासाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्ट‍िम (ITS) स्थापित केली जाणार असल्याची माहितीही मंत्री भुसे यांनी दिली.

सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि अपघातग्रस्तांना तातडीने सहाय्य करण्यासाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने, रुग्णवाहिका, गस्त वाहने, क्रेन, उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. सदस्य संजय गायकवाड, ज्ञानराज चौगुले आदींनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago