महाराष्ट्र

धक्कादायक : दीड वर्षाच्या चिमुकलीने हट्ट केल्यामुळे वडिलांनी तिला जोरात दारावर आपटले..

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून वडिलांनी आपल्या चिमुकलीला जोरात दारावर आपटले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात मंगळवारी ही घटना घडली आहे. मुलगी खाऊ खाण्यासाठी हट्ट करत रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला जोरात दारावर आपटले. त्यात गंभीररित्या जखमी होऊन मुलीचा मृत्यू झाला. विवेक विश्वनाथ उइके (वय २८) असे आरोपी पित्याचे नाव असून वैष्णवी विवेक उइके (वय १ वर्ष ८ महीने) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलीची आई वर्षा विवेक उइके (२२) हिने तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी विवेक विश्वनाथ उइके याला अटक केली आहे.

मंगळवारी विवेक एक लग्न समारंभ आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता घरी आला. त्यानंतर ७ वाजताच्या सुमारास मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी वर्षाने पती विवेककडे ५ रुपये मागितले. पैसे न दिल्यामुळे मुलगी जोरजोरात रडू लागली. तेव्हा रागाच्या भरात विवेकने वैष्णवीला पत्नीकडून खेचले व जोरात दारावर आपटले. तिथे चिमुकलीची आजीसुद्धा होती. वर्षाने पतीला अडविण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिलासुद्धा ढकलल्याने ती बाजूला पडली. मुलगी वैष्णवी गालावर व डोक्यावर इजा झाल्यामुळे पायरीजवळ पडली होती. बेशुद्धावस्थेत पडलेल्या वैष्णवीला रुग्णालयात नेण्यासाठी वर्षा पुढे गेली असता विवेकने वर्षाला मारहाण केली. त्यानंतर विवेक व सासूने मुलीला दवाखान्यात नेले. परंतु काही वेळाने ते मुलीला घेऊन परत आले असता मुलीचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, वर्षा व आरोपी विवेक यांचे लग्न २०१८ मध्ये झाले. या दाम्पत्याला वैष्णवी ही मुलगी झाली. मात्र, पती दारू पिऊन सतत भांडण व मारहाण करत असल्याने कंटाळून वर्षा माहेरी खडकी (जि. भंडारा) येथे वडील घनश्याम कंगाले यांच्याकडे राहायला गेली. दरम्यान, एक दिवस विवेकने मेव्हणा राकेशला फोन करून वर्षा व मुलीला लोणारा येथे आणून सोडण्यास सांगितले. त्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये वर्षा व आपल्या भाचीला राकेशने विवेककडे आणून सोडले. वर्षा वनमजुरी करून आपला व चिमुकल्या मुलीचा उदरनिर्वाह करत होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago