The jeep crashed into a ravine in Toranmal Ghat
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अतिशय भीषण अपघात झाला आहे. तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर एक जीप 70 फुट खोल दरीत कोसळली आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुर घेऊन जाणारी जीप 70-80 दरीत कोसळल्याने मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जीप खोल दरीत कोसळल्याने प्रवाश्यांचा शोध सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचे सर्व भाग दरीत इतस्ततः पडलेले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी मदतकार्य करीत आहेत. जखमींना रूग्णालयात नेण्यात येत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…