महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांची कार्यपद्धती अंगणवाड्यांच्या दर्जाची करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांच्या सशक्तीकरणासाठी महिला बालविकास विभाग व मुंबई महानगरपालिका यांचे समन्वयाने काम सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाने, राज्यातील सर्व अंगणवाडीचे जिओ मॅपिंग (अक्षांश-रेखांश) चे काम पूर्ण केले आहे, ह्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बालवाड्यांची सुद्धा मॅपिंग करून त्यांची कार्यपद्धती अंगणवाड्यांच्या दर्जाची करावी, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत अंगणवाडी व मुंबई महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्या यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ रुबल अग्रवाल, उपसचिव विलास ठाकूर, सहआयुक्त, मुंबई महानगरपालिका अजित कुंभार आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री लोढा म्हणाले, महानगरपालिकेमार्फत मुंबई शहर आणि उपनगर भागातील चालवण्यात येणाऱ्या बालवाड्या या महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांच्या दर्जाच्या करण्यात याव्यात. जेणेकरून बालवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आरोग्याची आणि पोषणाची काळजी घेतली जाईल. याकरिता महिला व बालविकास विभागाच्यावतीने आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात यावी. ही कार्यपद्धती मुंबई महानगरपालिकेला कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावी. महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांचे जिओ मॅपिंग पंधरा दिवसाच्या आत करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.

महानगरपालिकेच्या महिला व बालविकास निधीतून बालकांची वजन व उंची मोजण्यासाठीचे साहित्य सर्व बालवाड्यांसाठी खरेदी करून बालवाड्यांना उपलब्ध करून द्यावे. साहित्य कशा पद्धतीने घ्यायचे याची माहिती आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी मुंबई महानगरपालिकेला द्यावी. आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडीतील मुलांना खेळणी देण्यासाठी बाल विकास सेवा योजना आयुक्त कार्यालयात व महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यालयात देणगी कक्ष तयार करण्यात यावा, असेही निर्देश मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago