महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन : विरोधकांचा सभात्याग, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (17 जुलै) सुरू झाले. मात्र, विरोधकांनी कामकाज सुरू होताच थोड्या वेळाने सभात्याग केला. नंतर विरोधक कामकाज संपेपर्यंत सभागृहात परतले नाही. त्यानंतर पहिल्या दिवसाचे कामकाज अवघ्या काही तासांतच संपले.

दरम्यान, अधिवेशन सुरू होण्याअगोदर विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली’, ’50 खोके, एकदम ओके…’, ‘घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार’ अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट आले होते. पण शरद पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांपैकी एकहीजण तिथे उपस्थित नव्हता.

विरोधकांनी सभात्याग केला
कामकाज सुरू झाल्यानंतर अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा मांडण्यात आला. पुरेसा पाऊस पडलेला नाही, पेरण्या अपुऱ्या आहेत पण सरकारने शेतकऱ्यांकडे लक्षच दिलेले नाही, अशा स्वरुपाचा आरोप काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी केला. या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील. बोगस बियाणा संदर्भात कडक कारवाई करू. सकारकडून शेतकऱ्यांना 10 हजार कोटीचीं मदत देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या उत्तरानंतरही विरोधकांनी सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कायम ठेवला. यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध करत असल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago