महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक

मुंबई : वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या आंदोलनाबाबत आणि संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत मंत्रालयात चर्चा केली. यावेळी वैद्यकीय‍ शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांची भरती होण्याबरोबरच एकूण 12 मागण्या नेमक्या काय आहेत याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत 12 मागण्यांबाबत तसेच परिचारिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील असे सांगितले. तसेच काही मागण्यांबाबत इतर विभागाचे अभिप्राय घेणेही आवश्यक असल्याने ते लवकरात लवकर घेतले जातील असे नमूद केले. येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी देशमुख यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago