महाराष्ट्र

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास यावर्षीच्या प्रक्रियेत सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

महाडीबीटी पोर्टलद्वारे या दोनही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता केंद्रशासनाने अंतिम मुदत दिली होती, मात्र राज्य शासनाने काही अभ्यासक्रमांसाठीचे अंतिम प्रवेश अजूनही सुरू असल्याने विशेष प्रयत्नातून 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

यावर्षीच्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत 5 वेळा मुदत वाढ देण्यात आली असून ही सहावी वेळ आहे. या योजनांशी संबंधित विद्यार्थी व पालकांनी 28 फेब्रुवारीच्या आत महाडीबीटी पोर्टलद्वारे आपले अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago