महाराष्ट्र

कौतुकास्पद! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची मुख्यमंत्र्यांनी केली इच्छापूर्ती, दुपारी ऐकून घेतलेली अडचण सायंकाळपर्यंत सोडवली…

मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला दुमदुमून गेला. आपल्या मनातील दुःख वेदना दूर सारत त्यांनी मोठ्या आनंदाने गणरायाची आरती केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधारवड ठरलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील मुलांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

या मुलांनी शाळेला ये-जा करण्यासाठी पायपीट करावी लागते अशी अडचण सांगितली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मुलांसाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यावर तातडीने अंमलबजावणी करत सायंकाळपर्यंत नवी कोरी बस वर्षा येथे आणून या आश्रमशाळेचे महंत श्री शिवस्वरुपानंद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

दरम्यान, दुपारी ही मुले राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नक्की असते तरी कसे याबद्दल मनात प्रचंड कुतूहल बाळगत वर्षा निवासस्थानी आली होती. या सर्वांनी वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापित गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यानंतर ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात त्यांनी श्री गणरायाची आरती केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ही आरती चांगलीच रंगली. आरती सुरू असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांचेही आगमन झाले आणि त्यांच्या सोबत मुलांनी आरती केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा श्रीमती वृषाली शिंदे, माजी खासदार हेमंत पाटील, त्यांच्या पत्नी श्रीमती राजश्री पाटील आदी उपस्थित होते.

या श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने या मुलांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन केले होते. यात ही मुले अंगात शेतकरी सदरे, डोक्यावर टोपी घालून मोठ्या शिस्तीने टेबल खुर्चीवर येऊन बसली. त्यांच्यासाठी आज पंचपक्वांनांचा थाट होता. या भिरभिरत्या नजरेच्या मुलांनी जेवायला सुरूवात केली पण ती पदार्थ पुन्हा मागून घेणे किंवा समोर दिसत असलेले पदार्थ घ्यायला लाजत होती. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही अडचण ओळखली आणि ते सरसावले. मुख्यमंत्री शिंदे स्वतः एकेक पदार्थ घेऊन मायेने त्यांना आग्रह करून वाढू लागले. मुख्यमंत्र्यांनी या मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आधारतीर्थ आश्रमाला जाणवणाऱ्या काही अडचणी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. तसेच त्या तत्काळ सोडवण्याचे निर्देशही दिले.

सायंकाळी वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात नवीन बस आणण्यात आली. मंत्रोच्चारात तिचे पूजन करून मुख्यमंत्र्यांनी ही बस आश्रमाला सोपवली. मुख्यमंत्री शिंदे यांनी दुपारी ऐकून घेतलेली अडचण सायंकाळपर्यंत सोडवल्याचे पाहून ही मुले भारावून गेली. त्यांनी टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या सगळ्या मुलांनी मुख्यमंत्र्यांचे आदरातिथ्य स्वीकारत आणि मनात वर्षा बंगल्याच्या गोड आठवणी ठेवून नव्या कोऱ्या बसमध्ये बसून या भारावल्या नजरेने वर्षाचा निरोप घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago