ठाणे

ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ठाणे : गीता ग्रंथातील ज्ञान विश्वातील मानवता निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हे सरकार भगवद् गीतेच्या ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगरमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व विराट संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थिती लावून संत-महात्म्यांचे आशिर्वाद घेतले.

जगतगुरू स्वामी वासुदेवनंद सरस्वती महाराज, यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार युवराज बांगर, आयोजक श्वेता शालिनी आदी उपस्थित होते. वैदेही शंकराचार्य, योगी यतींद्रनंद महाराज, वल्लभदास महाराज, स्वामी चितरंजनदास, महामंडलेश्वर नवलकिशोर दास, भागवत कथाकार देवकीनंदन ठाकूर आदी संत मंडळी यावेळी उपस्थित होती. संतांच्या हस्ते उपमुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जेव्हा जेव्हा संस्कार समाप्त होतात तेव्हा संस्कृती समाप्त होते आणि जेव्हा संस्कृती संपते तेव्हा सभ्यता लोप पावते. मात्र, संतांनी संस्कार व संस्कृतीला लोप पावू दिले नाही. म्हणून आमची सभ्यता जिवंत आहे. विश्वात सर्वात पुरातन ही सनातन संस्कृती, हिंदू धर्म आहे. या संतांकडून आमचे मन शुध्द केले जात आहे. संस्कृति मिटवण्यासाठी मंदिराना पुन्हा जोडण्याचे काम महाराष्ट्राच्या कन्या अहिल्या देवी होळकर यांनी केले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद मोदी हे काम करत आहेत, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago