ठाणे

महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावे, दादाजी भुसे यांनी केली पाहणी

ठाणे : वडपे-ठाणे महामार्गावरील कामांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी पाहणी केली. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, रहदारी सुरळीत राहिल, यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच जिल्हा व ठाणे शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीसाठी तातडीने वॉर्डन नेमण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी आज वडपे – ठाणे महामार्गाच्या डांबरी रस्त्याचे आठ पदरी काँक्रिटीकरण करण्याच्या कामांची पाहणी केली. तसेच यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीए), पोलीस, परिवहन, महामार्ग पोलीस आदी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, कार्यकारी अभियंता सुहास बोरसे, उपअभियंता आर.एम. डोंगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील, यांच्यासह रस्त्याचे कंत्राटदार व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

भुसे यांनी वडपे ते खारेगाव नाका या मार्गाची पाहणी केली. वडपे-ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस विभाग व एमएसआरडीए यांनी एकत्रितपणे नियोजन करावे. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमून तातडीने वाहतूक कोंडी सोडविण्यात यावेत. यासाठी एमएसआरडीएने पोलीसांना ट्रॅफिक वॉर्डन पुरवावेत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यामुळे कोंडी होत असल्यास तेथील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. एखादे वाहन रस्त्यावर बंद पडल्यास तातडीने दूर करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी केल्या.

रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या मार्गावर खड्डे बुजविण्यासाठी मोबाईल व्हॅनसह यंत्रणा कार्यरत केली आहे. तसेच बंद पडलेली वाहने तातडीने दूर करण्यासाठी क्रेनची सुविधा पुरविण्यात आली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago