ठाणे

ठाणे जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे, १८.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील अंजुम, अलीमघर व खाडीमध्ये पावसाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकत कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण ५ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण ४८००० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण १८ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

खाडीमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागातील जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित जवानांनी ही कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी कोकण विभाग निरीक्षक यांच्या समन्वयाने छापे टाकण्यात आले. या कारवाईमध्ये हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर छापे टाकून २५० ड्रम्स रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेमध्ये बोटींमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केली.

हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे चालवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कलम ३२८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धडक कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे, असे उप आयुक्त पवार यांनी कळविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 दिवस ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 दिवस ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 दिवस ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

3 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

3 आठवडे ago