ठाणे

ठाणे : लोकल ट्रेनमध्ये महिलेच्या मोबाईलचा स्फोट

ठाणे : ठाणे जिल्ह्यात लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका अज्ञात महिला प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एका नागरी अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.

सोमवारी (१० फेब्रुवारी) रात्री ८ वाजून १२ मिनिटांनी कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही, असे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी पीटीआयला सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या वृत्तानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मोबाईल फोन स्फोट झाल्यामुळे लोकलमध्ये धुराचे लोट पसरले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक साधनांचा वापर केला.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एक छोटासा स्फोट ऐकू आला, ज्यामुळे डब्यात धूर पसरला, त्यानंतर अनेक प्रवाशांनी दरवाजाकडे जाण्यासाठी धाव घेतली. यामुळे काही काळ लोकलच्या डब्यात गोंधळाचे वातावरण पसरले होते. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. ज्या प्रवाशी महिलेच्या मोबाईलचा स्फोट झाला तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago