double murder
ठाणे : ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जगन्नाथ पाटील (८३) आणि सत्यभामा जगन्नाथ पाटील (७५) अशी हत्या झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील अकलोली परिसरातील पेंढारपाडा येथे हे वृद्ध पती-पत्नी राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री त्या दोघांचीही धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे शेजाऱ्यांनी आत जाऊन बघितले असता त्यांना धक्का बसला. दोघे वृद्ध पती-पत्नी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने तसेच होते. चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर किंवा चोरट्यांनी ही हत्या केली नसून, ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या दाम्पत्याची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…