महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा, आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव स्थगित – किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी 72 तासांच्या आत एका खाजगी बिल्डराची 500-700 कोटींची जागा 3000 कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला.

किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय उभं करण्यासाठी 7000 कोटी तसंच जमिनीसाठी 3000 कोटी तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 2000 कोटी मंजूर केले गेले. पण हे सगळं करताना कायदेशीर कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. सोमय्या यांचा आरोप आहे कि उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात, आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची, महानगरपालिका अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी चर्चा न करता कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा केली आणि या चर्चेच्या नंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने हा प्रस्ताव पास करण्याची तयारी केली.

किरीट सोमय्या आंनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांना हे रुग्णालय उभं करायचे नाही. फक्त आपल्या जवळच्या बिल्डरला 2000 कोटींचा फायदा पोहोचवण्यासाठी हा घोटाळा केला जात आहे. सोमय्या यांचं म्हणणं आहे की त्यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर हा प्रस्ताव सध्यासाठी थांबवण्यात आला आहे. राज्यपालांना भेटून त्यांना लोकायुक्तांकडून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago