Terrible accident due to collapse of slab of Mohini Palace building at Ulhasnagar
ठाणे : उल्हासनगर येथील कॅम्प १ भागात रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महापालिकेचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी पॅलेस ही रहिवासी इमारत तळ आणि वर चार मजल्यांची अशी असून या इमारतीचा स्लॅब दुपारी १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जवळपास १६ रहिवाशी अडकले होते. त्यातील ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी पाच जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बचावकार्य सुरू आहे.
चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली आहे. ही इमारत अनधिकृत असून १९९४ पासूनचे हे बांधकाम आहे. हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ही दुर्घटना घडल्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्त राजा दयानिधी तसेच स्थानिक आमदार कुमार आयलानी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…