महाराष्ट्र

यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि मंडळाने आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र असणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच त्यांनी परीक्षा द्यायची आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी, बारावी परीक्षांसंबंधीची सर्व माहिती आणि यंदाच्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या सूचना या पत्रकार परिषदेत दिल्या.

यंदा परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा ११ ऐवजी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. त्याआधी दहा मिनिटे म्हणजे १०.२० वाजता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येईल. यंदा दहावीची परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू होणार आहे आणि ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटे आणि ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव परीक्षा देता येणार नाही त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा देता येईल, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.

गोसावी यांनी सांगितले की लसीकरणाचे बंधन कोणाला करता येत नाही. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे बंधन नसले तरी आम्ही विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पुरेसा अवधी दिला आहे, त्यामुळे त्यांच्या पालकांनी लसीकरण पूर्ण करावे. आतापर्यंत राज्यभरात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. दहावी बारावी परीक्षेसाठी यंदा केंद्रांच्या संख्येत चौपट वाढ करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago