Health Minister Rajesh Tope instructs to pay attention to non-covid patient services
मुंबई : खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या बिलांचे लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी यांनी विविध मुद्यांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर टोपे यांनी या सूचना दिल्या.
मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव निलीमा करकेटृटा, आयुक्त एन. रामास्वामी, राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, संचालक साधना तायडे आदी उपस्थित होते. जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभय शुक्ला यांनी सादरीकरण केले. त्यांनी कोविडमुळे पती गमावलेल्या महिला, खासगी रुग्णालयांमध्ये आकारलेले जादा बिल, खासगी रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षणसाठी लागत असलेला वेळ अशा विविध विषयांवर मांडणी केली. त्यावर टोपे यांनी अभियानाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तपासणी केली जाईल. प्रलंबित राहिलेल्या बिलांची लेखा परीक्षण केले जाईल. त्यासाठी लेखापरीक्षकांची संख्या वाढवली जाईल, असे सांगितले.
खासदार सुळे यांनी पुणे, नाशिक येथील लेखापरीक्षणाअभावी प्रलंबित असलेल्या कोविड रुग्णांच्या खासगी रुग्णालयातील बिलांबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देण्याचे सांगितले. यावेळी जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…