महाराष्ट्र

होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक

मुंबई : राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली, यावेळी ते बोल्ट होते.

शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करावा, असे आरोग्यमंत्र्यांनी सां‍गितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (क्र.108) रुग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्याशी होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सीसीएमपी कोर्स केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी, राष्ट्रीय होमिओपॅथी कमिशनच्या सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोदिनी पागे, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, परिषदेचे रजिस्ट्रार वैद्य सोनमांकार, आमदार विक्रम काळे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे, आयुष संचालक डॉ.कोहली, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ अरुण भस्मे, विद्यापीठाच्या विद्या परीक्षेचे सदास्य डॉ. बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

7 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago