महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागात तपास यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : राज्यात तयार होणाऱ्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक व विक्रीस पायबंद बसावा, तसेच परराज्यातून होणारी अवैध मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपास यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागात केंद्रीकृत सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, वाहनांना डिजिटल लॉकिंग यंत्रणा तसेच बांधण्यात येणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारत बांधकाम आराखडा याबाबत मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. मंत्री देसाई म्हणाले, मद्यनिर्मिती ते मद्यविक्री या टप्प्यामध्ये वाहनांना डिजिटल लॉकिंग यंत्रणा असल्यास अवैध वाहतुकीस आळा बसेल. केंद्रीकृत सीसीटीव्ही यंत्रणेमुळे जिल्हा स्तरावरील यंत्रणा अधिक कार्यक्षम होतील तसेच विभागाच्या क्षेत्रीय इमारतीचा आराखडा सर्व ठिकाणी सारखा ठेवावा, अशा सूचनाही यावेळी मंत्री देसाई यांनी दिल्या.

या बैठकीत केंद्रीकृत सीसीटीव्ही यंत्रणा व डिजिटल लॉकिंग प्रस्ताव याबाबत सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, राज्य उत्पादन शुल्कचे उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago