महाराष्ट्र

आजपासून एसटी धावणार, असे असतील नियम…

गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. ‘उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा टप्याटप्याने सुरू होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे,’ असं परब म्हणाले.

यापूर्वीही सरकारनं एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय, काही जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं तुलनेने कमी प्रभावित जिल्ह्यांतून सरकारच्या या निर्णयाला विरोध झाला होता. त्यामुळं तो निर्णय स्थगित करावा लागला होता. आता पुन्हा एकदा राज्य सरकारनं एसटी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago