Indian women’s cricket team wins World Cup
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचत विश्वविजेतेपद पटकावले असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण देशाचे मस्तक अभिमानाने उंचावले असल्याच्या भावना व्यक्त करत क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विश्वकप विजेत्या महिला क्रिकेट चमूला शुभेच्छा दिल्या. संपूर्ण देशभरात भारतीय नागरिक तिरंगा हाती घेऊन अभिमानाने विश्वविजयाचा आनंद साजरा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री ॲड. कोकाटे यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, “संधी मिळाली तर भारतीय मुली जग जिंकू शकतात, हे आपल्या महिला खेळाडूंनी सिद्ध करून दाखवले आहे.”
‘क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम’ ही संकल्पना आज आपल्या रणरागिणींनी मोडीत काढली, असे सांगत ते म्हणाले की या विजयी महिलांनी जगाला दाखवून दिलं की जेंटलवूमनमध्ये देखील क्षमता, गुणवत्ता आणि संघर्षपूर्ण समानता आहे.
भारतीय स्त्रिया आता चूल आणि मूल यापलीकडे जाऊन कर्तृत्वाच्या नव्या सीमारेषा गाठत आहेत. महिला क्रिकेट संघाच्या या विजयाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भारतीय मुली कोणत्याही अर्थाने मुलांपेक्षा कमी नाहीत. त्या अधिक जिद्दी, जाज्वल्य आणि समर्थ आहेत, असेही क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांनी म्हटले आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…