महाराष्ट्र

पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकास कामांसाठीचा निधी वेळेत खर्च करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : जिल्ह्यातील पर्यटन व क वर्ग धार्मिक स्थळांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याबरोबर कामाचा दर्जा चांगला राहिला पाहिजे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोयना नगर येथील पर्यटन विकासाची जी कामे मंजूर आहेत ती लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच तापोळा ता. महाबळेश्वर येथील मंजूर कामेही तातडीने सुरु करावीत. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित असणाऱ्या विविध विकास कामेही वेळेत पूर्ण करावीत. ही कामे करत असताना कामांचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे. विकास कामांमध्ये काही अडचणी येत असल्यास तात्काळ सांगाव्यात त्याही सोडविल्या जातील असेही देसाई यांनी बैठकीत सांगितले.

बहुउद्देशीय कृषी संशोधन केंदाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा
शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचवावेल यासाठी पाटण तालुक्यातील काळोली येथे बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्राची निर्मिती करावयाची आहे. याचा तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या

बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कृष्णा, कोयना नदी काठी शेतकरी कोणती पिके घेतात याचा अभ्यास करावा. बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद विविध पिकांचे संशोधन, शेतमाल प्रक्रिया, पॅकिंग, ग्रेडिग व विक्री व्यवस्था, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयावरील प्रशिक्षण, कृषी विस्तार विषयक विविध प्रशिक्षण यासह अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सातारा नगर पालिका हद्दीतील विविध विकास कामांचा आढावा
पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा नगर पालिका हद्दीतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. सातारा नगर पालिकेकडून अंतर्गत रस्ते, भुयारी गटारे यासह अन्य विकासकामे वेळेत गुणवत्तेसह पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
यावेळी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठकही पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago