Young Lawyer Sagar Mandrupkar Dies by Suicide at His Residence in Solapur; Reason Still Unknown
सोलापूर : शहरात एका तरुण वकिलाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड) असे मृत वकिलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर हे आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत दोरीच्या साहाय्याने स्लॅबच्या लोखंडी हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे आणि इतर पदाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
अॅड. मंद्रूपकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. विशेष म्हणजे, १८ सप्टेंबर रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोलिसांकडून अॅड. सागर मंद्रूपकर यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी वकील संघटनेच्या वतीने पोलिसांकडे निवेदनही देण्यात आले होते.
या घटनेमुळे सोलापूर वकिली क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येचं खऱ्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…