सोलापूर

शिक्षकाची पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या, सोलापूरच्या बार्शी शहरातील धक्कादायक घटना

सोलापूर : एका शिक्षकाने पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या बार्शी शहरात घडली आहे. बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. अतुल मुंडे (वय 38) असे पत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. अतुल यांची पत्नी तृप्ती मुंडे (वय 37) देखील शिक्षिका होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंडे पती-पत्नी दोघेही शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, अतुल मुंडे यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, अतुलने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली व ११ वर्षीय मुलाच्या तोंडावर उशी ठेऊन त्याची हत्या केली, त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अतुल मुंडे हे बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये कुटुंबासह राहत होते. वरच्या मजल्यावर हे दाम्पत्य राहत होते तर खालच्या मजल्यावर अतुल मुंडे यांचे आई-वडील राहत होते. आज सकाळी उशिरापर्यंत कुणीही खाली न आल्यामुळे त्यांच्या आईने वरती जाऊन बघितले असता हा प्रकार उघडकीस आला. मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाचे मृतदेह आढळून आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अतुल मुंडे यांनी पत्नी आणि मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago