... so the fireworks business is in trouble 80% sales on Diwali
मुंबईः महाराष्ट्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. देशात सर्वाधिक फटाक्यांची विक्री मुंबईत होते. दरवर्षी देशात होणाऱ्या एकूण फटाका विक्रीपैकी जवळपास २५ टक्के विक्री मुंबईत होते. महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घातल्यास ही विक्री होणार नाही आणि फटाक्यांची बाजारपेठ कोलमडेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
फटाक्यांच्या विक्रीपैकी ८० टक्के विक्री ही दिवाळीत होते. दिवाळीत एका मागून एक राज्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्यास फटाका व्यवसाय अडचणीत सापडण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेश तसेच सांगली, जळगाव, नाशिक आणि औरंगाबादच्या काही भागांमध्ये फटाक्यांशी संबंधित व्यवसायावर शेकडो कुटुंबं अवलंबून आहेत. दिवाळी जेमतेम काही दिवसांवर आली असताना फटाक्यांवर बंदी घातल्यास अनेकांचे प्रचंड नुकसान होईल.
कोरोना संकटातून सावरत असलेल्या महाराष्ट्रात फटाक्यांची विक्री करण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करुन ठिकठिकाणी सुरक्षित गोदामांमधून कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांचा मोठा साठा करण्यात आला आहे. आयत्यावेळी बंदीचा आदेश आला तर या फटाक्यांसाठी पर्यायी बाजारपेठेचा शोध घेणे कठीण होईल. शिवाय नव्याने फटाक्यांची वाहतूक करण्यासाठी होणाऱ्या खर्चामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल. याच कारणामुळे फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यास व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…